title | date | description | type | image | slug | categories | tags | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पुरणपोळी (Puran Poli) |
2019-12-22 |
Marathi and English Recipe for marathmoli puran poli sweet chapati |
post |
images/masonary-post/puranachi-poli.jpg |
puranachi-poli |
|
|
{{% postlang lang="english" %}} Recipe coming soon in English... Please watch this space. {{% /postlang %}}
{{% postlang lang="marathi" %}}
- १ वाटी हरभरा डाळ,
- १ वाटी चिरलेला गूळ (डाळीपेक्षा किंचित जास्त),
- १ टीस्पून मीठ,
- ३ चमचे गोडे तेल,
- अर्धा टीस्पून हळद,
- विलायची,
- २ ते अडीच वाटया कणिक (साधारणपणे ४ साध्या पोळ्या होतील एवढी).
-
पुरण: हरभऱ्याच्या डाळीत तिप्पट पाणी,
-
अर्धा चमचा गोडे तेल, पाव टीस्पून हळद घालून, छोट्या कुकर मध्ये ५-६ शिट्ट्या करून डाळ मऊ शिजवून घेणे.
-
मग डाळ छान घोटून घेऊन त्यात चिरलेला गूळ, पाव टीस्पून मीठ घालून नीट हलवावे.
-
पुरण पूर्ण एकजीव होईपर्यंत नीट शिजवणे.
-
गॅस बंद करून त्यात विलायचीची पूड टाकावी.
-
कणिक: कणिक घेऊन त्यात, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून मीठ व १ चमचा गोडे तेल घालून घट्ट मळून अर्धा तास ठेवावे.
-
मग एक वाटी पाणी घेऊन त्यात अर्धा टीस्पून मीठ विरघळवून, ते पाणी लावून लावून कणिक थोडी सैल करावी.
-
नंतर वरून दीड चमचे तेल टाकावे. आणि मग कणकेत पुरण भरून पुरणपोळ्या कराव्यात.
टीप: पुरणपोळ्या लाटताना वरून लावण्यास तांदुळाची पिठी वापरावी.
{{% /postlang %}}