title | date | description | type | image | slug | categories | tags | |||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
बीटरूट पराठा (Beetroot Paratha) |
2020-12-19 |
Marathi and English Recipe for beetroot paratha |
post |
images/masonary-post/post-1.jpg |
beetroot-paratha |
|
|
{{% postlang lang="english" %}} Recipe coming soon in English... Please watch this space. {{% /postlang %}}
{{% postlang lang="marathi" %}}
- २ मध्यम आकाराची बीट
- ३ वाट्या कणिक
- पाव वाटी मूगडाळ
- पाव वाटी हरभरा डाळ
- ५-६ लसूणपाकळ्या
- १ टीस्पून ओवा
- अर्धा टीस्पून तिखट
- मीठ चवीनुसार
- तेल
- साधारणपणे एक तास आधी हरभरा डाळ व मूग डाळ कोमट पाण्यात भिजत घालावी.
- बीट कच्चे किसून घ्यावे.
- भिजलेली मूगडाळ, हरभरा डाळ, लसूण, ओवा मिक्सरमधून बारीक फिरवून, परातीमध्ये काढून घ्यावे. ह्यामध्ये बारीक करताना पाणी घालू नये.
- मग ह्यामध्ये किसलेले बीट, चवीनुसार मीठ, तिखट, १ चमचा तेल व ३ वाट्या कणिक घालावी.
- वरील सर्व पदार्थ एकत्र करून, पोळीसाठी मळतो तसे पीठ मळून घ्यावे.
- ह्याचे त्रिकोणी पराठे लाटून, दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्यावे.
- हे पराठे अतिशय रुचकर लागतात.
{{% /postlang %}}